सफेलकरच्या आणखी एका साथिदाराला अटक; २८ पर्यंत पोलिस कोठडी

सफेलकरच्या आणखी एका साथिदाराला अटक; २८ पर्यंत पोलिस कोठडी

नागपूर : शहरातील बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांड (Manish Srivastava murder) घडविणाऱ्या रणजित सफेलकरचा (Ranjit Safelkar) आणखी एका साथिदाराला गुन्हे शाखेने अटक केली. रवी ऊर्फ छोटू टिकाराम बागडे (३९, रा. कपिलनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बागडेला न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅंगस्टर रणजित सफेलकरचा साथीदार छोटू बागडे हा सहा महिन्यांपासून फरार होता. रणजित सफेलकर टोळीतील सदस्य असलेला छोटू बागडे, इशाक मस्ते आणि मनीष श्रीवास हे तिघे खास मित्र होते. मात्र, मनीष श्रीवास याने रणजित सफेलकरला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सफेलकरने मनीषच्या हत्याकांडाचा कट रचला.

सफेलकरच्या आणखी एका साथिदाराला अटक; २८ पर्यंत पोलिस कोठडी
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

आंबटशौक असलेल्या मनीषला मौजमजा करण्यासाठी तरुणी आणल्याचे आमिष दाखविण्यात आले. मनीष याला शेतात आणण्याची जबाबदारी छोटू बागडेवर हाटे याला सोपविली. त्यानुसार, बागडे घटनेच्या रात्री मनीषच्या घरी गेला. फार्महाऊसवर तरुणी आणल्याचे सांगून छोटूने मनीषला कारमध्ये बसवले. नंतर ते पवनगावच्या फार्महाउसवर गेले. तेथे रणजित सफेलकर, कालू हाटे, भारत हाटे, सिनू अण्णा, इशाक मस्ते, हेमंत गोरखा, विनय बाथो हजर होते.

कारमधून उतरताच या सर्वांनी छोटूवर शस्त्राचे सपासप वार घालून हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून दरीत फेकले. २०१२ मध्ये हे हत्याकांड घडले. आठ वर्षांपासून मनीष श्रीवास हत्याकांड दबले होते. मात्र, गुन्हे शाखेने छोटू बागडेला अटक केली. जिल्हा न्यायाधीश न्या. व. भ. कुलकर्णी यांनी बागडेला २८ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com