Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली
Akola Police : अकोला येथील खदान पोलीस स्टेशनमधील डीबी स्कॉडमधील पोलीस कर्मचारी नितीन मगर यांच्यावर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई झाली असून, यामुळे खदान पोलिसांची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे.
अकोला : एका प्रकरणात पोलिस अधिक्षकांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक खदान पोलिस स्टेशनमधील डीबी स्कॉडमधील नितीन मगर हे पोलिस कर्मचारी निलंबीत झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.