esakal | होळीला चायना मेड पिचकाऱ्या, रंग वापरू नका... अन्यथा भोगावे लागतील हे परिणाम 
sakal

बोलून बातमी शोधा

china made

राज्यात करोना विषाणू बाधित भागातून आलेल्या 401 प्रवाशांपैकी 318 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. विदेशातून नागपूर, चंद्रपूर, वर्धा शहरात दाखल झालेल्या 39 जणांवर आरोग्य सेवेच्या नागपूर विभागातील डॉक्‍टरांची नजर आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 39 संशायित करोना रुग्णांपैकी 21 जणांवर 14 दिवस डॉक्‍टरांची पाळत होती. सद्या 18 करोना संशयित व्यक्तींवर आरोग्य विभागातील डॉक्‍टरांकडून पाठपुरावा सुरू आहे. नागपूर विभागात 16 रुग्णांना करोनाचा संशयामुळे भरती करण्यात आले होते. रुग्णांचे नमूने निगेव्टीव्ह आले. 18 जानेवारीपासून बुधवार 4 मार्च पर्यंत बाधित भागातून आलेल्या 149 रुग्णांचे नमूने राज्यातील विविध रुग्णालयात घेण्यात आले होते. ते सर्व निगेटिव्ह आहेत. 

होळीला चायना मेड पिचकाऱ्या, रंग वापरू नका... अन्यथा भोगावे लागतील हे परिणाम 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : करोना विषाणूच्या प्रसाराचे मुख्य केंद्र चीन आहे. शेकडो माणसांचा बळी या विषाणूने घेतला आहे. याबाबत खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. सर्वत्र भयाचे वातावरण आहे. पाच दिवसांवर होळीचा सण आला आहे. होळीचे रंग, कलर फुगे, पिचकारी या साऱ्या वस्तू चीनमधून येतात. त्यामुळे होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर करोना बाबत खबरदारी घेताना एका दिवसाच्या रंग खेळून आनंद लुटण्यासाठी आयुष्य धोक्‍यात घालू नका, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. 

करोना विषाणूबाबत राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. करोनाची दहशत सर्वत्र पसरली असल्याचे चित्र दिसून येते. मेडिकल, मेयोतील सुरक्षारक्षक तोंडावर मास्क लावून काम करीत आहेत. या सुरक्षा रक्षकांना एन-95 मास्क म्हणजे ठावूक नाही, परंतु बचावासाठी कापडाचे मास्क तयार करून तोंडावर लावण्यात येत आहेत. हे चित्र मेडिकलमधील कान, नाक, घसा रोग विभागासह मेयो, डागा, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व डॉ. आंबेडकर रुग्णालयात दिसून येते. 

आली होळी, घ्या काळजी 
राज्यात करोना विषाणू बाधित भागातून आलेल्या 401 प्रवाशांपैकी 318 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. विदेशातून नागपूर, चंद्रपूर, वर्धा शहरात दाखल झालेल्या 39 जणांवर आरोग्य सेवेच्या नागपूर विभागातील डॉक्‍टरांची नजर आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 39 संशायित करोना रुग्णांपैकी 21 जणांवर 14 दिवस डॉक्‍टरांची पाळत होती. सद्या 18 करोना संशयित व्यक्तींवर आरोग्य विभागातील डॉक्‍टरांकडून पाठपुरावा सुरू आहे. नागपूर विभागात 16 रुग्णांना करोनाचा संशयामुळे भरती करण्यात आले होते. रुग्णांचे नमूने निगेव्टीव्ह आले. 18 जानेवारीपासून बुधवार 4 मार्च पर्यंत बाधित भागातून आलेल्या 149 रुग्णांचे नमूने राज्यातील विविध रुग्णालयात घेण्यात आले होते. ते सर्व निगेटिव्ह आहेत. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाचा दणका, हे आहे कारण

ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्याने 39 जणांना नागपुर विभागात वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी नागरिकांना सल्ला दिला आहे. लोकांना स्वच्छतेशी संबंधित नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. करोना विषाणूबद्दल व्यापक जनजागृतीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या निगराणीत कंट्रोल रूम निर्मिती केली आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात चार खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी काही खास उपाय करण्याची गरज नाही. त्याऐवजी जीवनशैलीबाबत सावध असणे आवश्‍यक आहे, आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.