Nagpur : ‘आपुलकी‘ने राष्ट्रवादीचे विदर्भात नेटवर्क भक्कम करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

‘आपुलकी‘ने राष्ट्रवादीचे विदर्भात नेटवर्क भक्कम करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकट करण्याचे काम सुरू आहे. आता बूथ बांधणीपासून काम करण्यावर भर देत आहोत. सोबतच राष्ट्रवादीकडे असलेले शरद पवार यांच्यासारखे दूरदृष्टी लाभलेले सक्षम नेतृत्व आणि राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारखे दमदार नेते असल्याने अशक्यसुद्धा काही नाही. ‘आपुलकी‘ असलेल्या सुशिक्षित, होतकरू तरुणांच्या साथीने हे आव्हान आपण पेलण्याचा निर्धार केला असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव अभिजित फाळके यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांच्या स्वागतासाठी नागपूरला आले असता अभिजित फाळके यांनी ‘सकाळ'' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पक्षासमोरील आव्हाने, पक्षवाढीसाठी येत असलेल्या अडचणी, विदर्भातील नेतृत्व यावर मोकळेपणाने चर्चा केली. अभिजित हे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबातील असलेले अभिजित माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रात नाव कमावले आहे. मुंबई व पुणे या शहरांमध्ये त्यांनी प्रामुख्याने काम केले आहे.

विदर्भातील संत्रा उत्पादकांना त्यांनी या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. माती आणि शेतकऱ्यांसोबत नाळ जुळली असल्याने त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये संवाद यात्रा काढली होती. या दरम्यान त्यांनी ५६ गावांना भेटी दिल्या. सार्वत्रिक ७५० समस्या गोळा केल्या. त्या घेऊन वेगवेगळ्या व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेतली. त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. या माध्यमातून जयंत पाटील यांनी फाळके यांना हेरले. तुमच्या सारख्या तरुणांची राष्ट्रवादीला गरज असल्याचे सांगितले. त्यांनी सतत दोन वर्षे पाठपुरावा केला. त्यानंतर अभिजित यांनी राष्ट्रवादीसोबत जुळण्याचा निर्णय घेतला.

अभिजित यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून शेतकरी, विदर्भाचा विकास, सिंचन आदी विषयाला वाचा फोडण्याचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून त्यांनी वर्धा जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेचे प्रलंबित १० कोटी रुपये सरकारकडून मिळवून दिले. आपला सर्व फोकस त्यांनी शेतकऱ्यांवर केला आहे.

loading image
go to top