शिर्डी दर्शनाला नेऊन बलात्कार नंतर लग्नास नकार; प्रियकराला अटक

शिर्डी दर्शनाला नेऊन बलात्कार नंतर लग्नास नकार; प्रियकराला अटक

नागपूर : बाराव्या वर्गात शिकत असताना झालेल्या प्रेमसंबंधातून प्रियकराने प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवले. प्रेयसीला शिर्डी येथे दर्शनाच्या बहाण्याने नेऊन लॉजवर बलात्कार (Atrocities on girl) केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार (Refusal to marry after a love affair) दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रेयसीने प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आशीष नारायण वानखेडे (२७, रा. उत्थाननगर, गोरेवाडा) असे आरोपीचे नाव आहे. (Arrest-of-boyfriend-who-refuses-to-marry)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) ही गिट्टीखदान परिसरात राहते. ती सध्या शिक्षण घेत असून आशीष वानखेडे हा तिचा वर्गमित्र आहे. बारावीत असताना दोघांची ओळख झाली होती. आशीषने २०१८ मध्ये मैत्री केल्यानंतर तिच्याशी चॅटिंग केली. काही दिवसांतच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. शिक्षण घेत असल्याने ती कॉलेजच्या बहाण्याने आशीषसोबत फिरायला जात होती. त्याने तिला शिर्डीला देवदर्शनाला जायचे असल्याचे सांगून आई-वडिलांकडून परवानगी घेण्यास सांगितले.

शिर्डी दर्शनाला नेऊन बलात्कार नंतर लग्नास नकार; प्रियकराला अटक
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

मैत्रिणीसोबत दर्शनाला जात असल्याचे सांगून ती आशीषसोबत शिर्डीला गेली. तेथे आशीषने एका लॉजवर नेऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो केव्हाही तिला फिरायला घेऊन जात लॉजवर नेऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्याने आतापर्यंत डोंगरगड, रामटेके येथे देवदर्शनाच्या नावावर घेऊन जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

तक्रारीवरून आशीषला अटक

गेल्या काही दिवसांपासून तिने आशीषकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, आशीष टाळाटाळ करीत होता. ती आई-वडिलांशी भेट करून देण्यावर अडली होती. त्यामुळे आशीषने तिला शिविगाळ करीत लग्नास नकार दिला. संतप्त झालेल्या रियाने मानकापूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली.

(Arrest-of-boyfriend-who-refuses-to-marry)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com