शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

काटोल (जि. नागपूर) : स्थानिक फाईलपुरा येथील रहिवासी शहीद भूषण रमेश सतई (Shaheed Bhushan Ramesh Satai) यांचे वडील रमेश धोंडू सतई (वय ६०) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Ramesh Satai committed suicide) केली. ही घटना २१ जून रोजी पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. माहिती मिळताच सकाळी सहा वाजता काटोल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. रमेश सतई यांचा मृत्यू गळफास लावल्याने झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी दिली. (Martyr-Bhushan's-father-commits-suicide)

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर २०२० रोजी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात काटोलचे सुपुत्र भूषण रमेश सतई शहीद झाले होते. शहीद भूषण सतई २०१० मध्ये नायक पदावर रुजू झाले होते. श्रीनगर येथील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. तेथे त्यांना वीरमरण आले. देशासाठी प्राणाची आहुती देत शहीद भूषण सतई यांनी आई-वडिलांसोबतच काटोल व जिल्ह्याची मान उंचावली होती. मात्र, त्यांच्या वडिलांनी गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या
कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

मुलगा भूषण याला वीरमरण आल्यानंतर रमेश सतई यांना मोठा धक्का बसला होता. याच विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आहे. रमेश हे फैलपुरा काटोल भागात राहत होते. सतई यांच्या आत्महत्येनंतर पत्नी सरिता सतई, लहान मुलगा लेखनदास सतई आणि मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे.

वयाच्या विसाव्या वर्षी सैन्यात

श्रीनगरमधील गुरेज सेक्टर येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान भूषण सतई यांना वीरमरण आले होते. घरी दिवाळीची तयारी सुरू होती अन् ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला जवानाच्या वीरमरणाची बातमी समजली. त्यामुळे कुटुंबीयांसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले असून ते केवळ २८ वर्षांचे होते. भूषण सतई यांनी महाविद्यालयात असतानाच सैन्यात भरती होण्यासाठी तयारी केली होती. ते वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय सैन्यात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com