Summer Camp : कलावंत घडवत आहेत भावी पिढी

नाट्य, नृत्य कार्यशाळा, शिबिरे बहरली; कौशल्य गुणांना झळाळी.
drama
dramasakal
Updated on

नागपूर - उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांना भरपूर मोकळा वेळ मिळतो. त्यांच्या मोकळ्या वेळेचा उपयोग काही कलात्मक, सर्जनशील प्रयोग करण्यासाठी किंवा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे मुलांची उन्हाळी शिबिरांना चांगली गर्दी होत असून मुले आनंदाने कलेचे धडे गिरवित आहेत. ज्येष्ठ, तज्ज्ञ कलावंतासह युवा कलावंत शिबिरांच्या माध्यमातून नवी पिढी घडवत आहे.

नाट्याभिनयात ग्रामीण भागातील मुलांचाही सहभाग

अभिनय प्रशिक्षण कार्यशाळांच्या माध्यमातून शहर, गाव, तालुका आणि वस्तीपातळीवरील मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाट्याभिनयाचे धडे ग्रामीण भागातील मुलेही मोठ्या आत्मविश्‍वासाने गिरवत आहेत. रंगमंचीय खेळ, रंगभूमीची ओळख ही कार्यशाळांची संकल्पना असते. मुले आनंदाने आणि आत्मविश्‍वासाने अभिनय शिकत असून, छोटे नाट्य प्रयोग करत आहेत.

शाळा, महाविद्यालयांची परिक्षा पूर्ण झाली असल्याने विविध वस्त्यांमध्ये अभिनय कार्यशाळा घेतल्या जात आहेत. मुलांनाही बालनाट्याशी जोडता यावे, त्यांनाही बालनाट्याचे जग कळावे आणि त्यांनी याचा आनंद लुटावा, नाट्याभिनयात पाऊल ठेवावे, यासाठी बाल नाट्य शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात येत आहे.

पाश्‍चिमात्य नृत्य शिबिरे हाऊसफुल्ल

नागपूरमध्ये नृत्य शिक्षण देणाऱ्या संस्था आणि नृत्य वर्गाची संख्या वाढली आहे. त्यामध्ये, हीप हॉपपासून ते शास्त्रीय नृत्य प्रकार शिकविणाऱ्या संस्था आणि वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. नागपूरमध्ये पाश्‍चिमात्य नृत्य संस्कृतीचा पगडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच यंदा वैविध्यपूर्ण नृत्य प्रकार शिकविणाऱ्यांचा उन्हाळी शिबिरांकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल आहे.

बसोलीकडून रात्रकालीन शिबिर

नुकत्याच पन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या बसोली या बाल चित्रकारांच्या समूहातर्फे १ जून रोजी ‘माय ड्रीम फेस्टीवल’ या संकल्पनेवर आधारित रात्रकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीनगर येथील बालजगत येथे सायंकाळी ७.३० वाजता या उपक्रमाला सुरवात होणार असून २ जून रोजी पहाटे सहा वाजेपर्यंत हे शिबिर चालेल. लक्ष्मीनगर येथील बालजगत येथे अकरा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे शिबिर होईल. यात तज्ज्ञ चित्रकारांचे मार्गदर्शन मुलांना लाभणार आहे.

सुट्यांमध्ये मुलांसाठी या पाच गोष्टी

  • कौशल्ये विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम सुरु करा (उदा. संभाषण कौशल्य, तांत्रिक कौशल्ये, भाषा ज्ञान)

  • उन्हाळी शालेय कार्यक्रम किंवा उन्हाळी शिबिरे (उदा. सामाजिक संस्थांमध्ये स्वयंसेवा)

  • खेळ आणि मैदानी उपक्रमात सहभाग

  • आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करा, फिटनेस सुधारा (उदा. शारीरिक व्यायाम, मानसिक दृष्टीने फिट राहण्यासाठी ध्यान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.