
नागपूर : मानकापूरचे उदाहरण ताजे असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवरही पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचा वावर अधिक प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नियमित सराव करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या सरावात अडथळा व व्यत्यय येऊ लागल्याने विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने खेळाडूंसाठी नवी नियमावली तयार केली आहे.