नागपूर: नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच कोरोनाच्या काळात नोकरी नसल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे अनेकांवर अक्षरशः दुसऱ्यांसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे. तर मजूर, रिक्षावाले आणि हात कामगार यांच्यावर तर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र गेल्या दोन दिवसात नागपुरात मृत्यू तांडव बघायला मिळाले आहे.
कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या काही लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना तर काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसात विविध घटनांमध्ये तब्बल ११ जणांचा जीव गेला आहे. रिक्षाचालकासह दोन वृद्धांनी आत्महत्या केली. सीताबर्डी, एमआयडीसी, कोराडी, सदर, जरीपटका, प्रतापनगर, पाचपावली, लकडगंज, पारडी, हिंगणा, शांतीनगर हद्दीत या घटना घडल्या आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.