सावधान, ATM मशिनला स्कॅनर! तुमच्या CVV नंबरसह पासवर्डही होतो स्कॅन

atm card
atm cardesakal

नागपूर : सायबर गुन्हेगार (cyber crime) एटीएम मशीनमध्ये स्कॅनर लावून ग्राहकांच्या एटीएमचा नंबर आणि पासवर्ड चोरून खात्यातून पैसे लंपास करीत आहेत. सायबर गुन्हेगारांना आता नवीन फंडा सुरू केला असून संपूर्ण देशभरात गुन्हेगार एटीएम स्कॅन किंवा क्लोन करून गंडा घालत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना सतर्क रहा...अन्यथा आपणही सायबर गुन्हेगारांची शिकार ठरू शकता.

atm card
२१ दिवसांचा संसार पाण्यात बुडाला, नवदाम्पत्याला एकाच सरणावर निरोप
atm card
वर्धा नदीत काय घडलं? बचावलेल्या श्यामने सांगितला भयानक अनुभव

पूर्वी एटीएममध्ये गुन्हेगार हा पैसे काढून देण्याच्या बहाण्याने कार्डची अदलाबदल करीत होता किंवा चोरून पासवर्ड बघत होता. त्यानंतर एटीएम क्लोनिंग करून आपल्या खात्यातून पैसे लंपास करीत होता. परंतु, अनेक जण स्वतःच एटीएमचा व्यवहार करायला लागले. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा तयार केला आहे. एटीएम कार्डचे क्लोनिंग किंवा स्कॅनिंग करून त्याद्वारे पैसे काढण्याच्या सपाटा सुरू केला आहे. एटीएम कार्ड क्लोनिंग करण्यासाठी, एटीएमच्या आत क्लोनिंग मशीन फिट केल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत. उपराजधानीसह राज्यभरात अनेकांचे अशाच प्रकारे पैसे लंपास झाल्याच्या शेकडो तक्रारी आल्या आहेत.

असा होतो फ्रॉड

एटीएममध्ये कार्ड स्वाईपच्या जागी स्किमर (स्कॅनर) डिव्हाईस लावल्या जाते. ज्यावेळी व्यक्ती पैसे काढण्यासाठी आपले एटीएम कार्ड स्वाईप करतो, त्यावेळी त्याचा संपूर्ण डेटा म्हणजे कार्डच्या मागची काळ्या रंगाची स्ट्रिप, सीवीवी नंबरही स्कॅन होतो. एटीएमच्या किपॅडजवळ एक छोटा कॅमेरा लावल्या जातो. त्यामुळे चार अंकी पासवर्ड सहजपणे व्हिडीओत येतो.

atm card
एकाचवेळी निघाली चौघांची अंत्ययात्रा, गावात फुटला अश्रूचा बांध

अशी टाळा फसवणूक

एटीएममधून पैसे काढताना पंप पॅनेल किंवा कार्ड स्लॉट म्हणजेच जिथे कार्ड स्वॅप केले जाते, त्याकडे लक्ष द्या. तो स्लॉट हाताने ओढून बघा. जर कार्ड स्वाईप करण्याच्या जागेवर स्किमर लावले असेल तर लगेच ते बाहेर निघेल. अशा एटीएममधून पैसे काढू नका. तसेच हिडन कॅमेरा पासवर्ड चोरण्यासाठी लावलेला असतो. तो किपॅडजवळच लावला असण्याची शक्यता असते. त्यामुळे केव्हाही किपॅडवर हात झाकूनच पासवर्ड टाका.

असा होतो वापर -

स्कॅनरमध्ये दिवसभरातील शेकडो कार्डचा डेटा जमा केला जातो. तसेच छुप्या कॅमेऱ्याद्वारे पासवर्डचेही व्हिडिओ काढले जातात. रात्रीच्या सुमारास गुन्हेगार एटीएममध्ये जाऊन स्कॅनर काढतात. लॅपटॉपला स्कॅनर जोडून दिल्ली, उत्तरप्रदेश, जामतारा या ठिकाणी बसलेल्या साथीदारांना डाटा पाठविण्यात येतो. तेथे कोऱ्या एटीएम कार्डात डाटा फीड करून पासवर्ड वापरून पैसे काढल्या जातात.

एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्या. सुरक्षित ठिकाणी असलेल्या एटीएमची निवड करा. जेथे सुरक्षारक्षक असेल, तेथूनच पैसे काढा. एटीएमला स्कॅनर बसविले की नाही, याची खात्री करण्यासाठी स्वाईप स्लॉट हाताने ओढून बघा. काही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या.
- केशव वाघ. प्रभारी, सायबर पोलिस स्टेशन, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com