Nagpur ATM Thefts : पाच वर्षांत चोरट्यांनी फोडले ४२ एटीएम; पन्नास लाखांपेक्षा अधिक रक्कम लंपास, ५५ प्रकरणात गुन्हे
ATM Thefts: नागपूरमध्ये मागील पाच वर्षांत ४२ एटीएम फोडले गेले असून, त्यातून ५० लाख ४७ हजार रुपयांची लूट झाली आहे. पोलिसांनी १९ आरोपींना अटक केली, परंतु जप्तीचे प्रमाण अत्यल्प आहे.
नागपूर : घरफोडीपेक्षा चोरट्यांना एटीएम फोडणे अधिक सोपे असल्याचे दिसून येत आहे. थोड्या मेहनतीत भरभक्कम पैसे हाती लागण्याची हमी असल्याने मागील पाच वर्षांत शहरातील तब्बल ४२ एटीएम फोडण्यात आले आहेत.