Atrocity : नागपुरात अल्पवयीन मुलीवर गँगरेप; बॉयफ्रेंडसह सख्या भावांचे कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atrocities on a minor girl in Nagpur

नागपुरात अल्पवयीन मुलीवर गँगरेप; बॉयफ्रेंडसह सख्या भावांचे कृत्य

नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसह दोन सख्या भावांनी सामूहिक बलात्कार (Atrocities) केल्याची खळबळजनक घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बॉयफ्रेंड यश कांबळे (१९, रा. इंदोरा) याला अटक केली आहे. तर ऋषिल खोब्रागडे (१९) आणि रक्षित खोब्रागडे (२१) या दोन भावांचा शोध पोलिस घेत आहे. (Atrocities on a minor girl in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही १७ वर्षांची आहे. ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेते आहे. तर यश हा मजुरी करतो. एकाच वस्तीत राहत असल्याने तिची यशसोबत ओळख होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत नंतर प्रेमात झाले. दोघेही २०२० पासून संबंधात होते. दरम्यान, मुलीला दुसऱ्या युवकासोबत प्रेम झाले. यातून दोघांमध्ये भांडणे व्हायला लागली.

हेही वाचा: युक्रेनच्या महिलांवर बलात्कार केल्यानंतर केले ठार; डॉक्टरांचा दावा

यामुळे मुलगी यशला भाव देत नव्हती. या कारणाने यश चिडला होता. अधूनमधून तो मुलीच्या संपर्कात राहत होता. दोघांत बोलणे होत होते. १७ एप्रिलला यशने मुलीला घरी बोलावले. यशच्या घरी कुणी नव्हते. त्याने आधी मुलीशी शारीरिक संबंध (Atrocities) प्रस्थापित केले. काही वेळातच याच भागात राहणारे यशचे मित्र ऋषिल आणि रक्षित दोघेही घरी आले. यशने मुलीला तुझे अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगितले. ते व्हायरल करण्याची आणि दोघांना दाखविण्याची धमकी दिली. दोघांनीही यशच्या मदतीने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

वैद्यकीय तपासणीनंतर भावांचा उलगडा

मुलीने २४ एप्रिल रोजी जरीपटका पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आधी यशवर बलात्काराचा (Atrocities) गुन्हा नोंदवला व अटक केली. मुलीची वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरांकडे तिने ऋषिल आणि रक्षित या दोघांची नावे घेतली. त्यामुळे घटनेच्या दिवशी तिघांचा सहभाग होता, असे पोलिसांना सांगितले. पोलिस निरीक्षक बाकल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इतर दोघांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Atrocities On A Minor Girl In Nagpur Actions Of A Brothers With A Boyfriend Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..