esakal | अविवाहित असल्याचे सांगून बलात्कार; प्रेयसीने प्राशन केले विष, गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

atyachar

अविवाहित असल्याचे सांगून बलात्कार; प्रेयसीने प्राशन केले विष

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : अविवाहित असल्याचे सांगून प्रेयसीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा प्रियकर विवाहित निघाला. त्याला तीन मुले असल्याची माहिती मिळताच प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पारडी पोलिसांनी युवतीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला. नसीम नियाजउद्दीन अन्सारी (३८, रा. टेकानाका, नवीवस्ती) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम अन्सारी हा खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याचे लग्न झाले असून पत्नी व तीन मुले आहेत. जुलै २०२० मध्ये पाचपावली परिसरात असलेल्या नातेवाइकाच्या लग्नाला नसीम गेला होता. लग्नसमारंभात २३ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) हिच्याशी त्याची ओळख झाली. लग्नातच दोघांनी संवाद साधला आणि रियाचा मोबाईल नंबर घेतला. तेव्हापासून दोघे फोनवरून संपर्कात होते.

नसीमने स्वतःला अविवाहित सांगून प्रेमाची मागणी केली. तिनेही प्रेमास होकार दिला. दीड वर्षांपासून दोघांचे प्रेमप्रकरण आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या महिन्यात तिने लग्नाचा तगादा लावला. शेवटी तिने नसीमचे घर गाठले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रियकराची बायको आणि तीन मुले घरी उपस्थित होते. त्यामुळे ती चिडली.

हेही वाचा: सुंदर तरुणी दिवसा करतात स्टाफच काम, रात्री करतात देहव्यापार

विश्‍वासघात केल्यामुळे तिने काही नातेवाइकांसह नसीमच्या कपिलनगरातील नातेवाइकाचे घर गाठले. तेथे नसीमलाही पत्नी व मुलांसह बोलावले. शेवटी भंडाफोड झाल्यानंतर रियाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाइकांनी लगेच तिला रुग्णालयात दाखल केले. कपिलनगर पोलिसांनी रियाचे बयाण घेतल्यानंतर पुढील तपासासाठी पारडी पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले. पारडी पोलिसांनी नसीमवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top