esakal | दोन विद्यार्थिंनीवर बलात्कार; एक तीन महिन्यांची गर्भवती, आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार

बोलून बातमी शोधा

Atrocities on two schoolgirls one girl A three month pregnant nagpur crime news

रात्री आठच्या सुमारास मुलगी घरी आली. तिच्या आईने तिला विचारणा केली असता रडायला लागली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून राजू कोटरंगे यास अटक केली.

दोन विद्यार्थिंनीवर बलात्कार; एक तीन महिन्यांची गर्भवती, आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : शहरात महिला, युवती आणि अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. तर आजही शांतीनगर आणि कोराडी हद्दीत राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

१७ वर्षीय मुलीला वडील नसून आई, आजी, भाऊ आणि बहिणीसोबत ती शांतीनगर राहते. मुलगी त्याच परिसरातील एका शाळेत शिकते. मुलीची आई ही मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविते. आईला हातभार म्हणून मुलगी देखील त्याच परिसरात एका घरी काम करते. त्याठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामावर खरबी येथील राजू कोटरंगे (३२) हा कामाला होता. मुलगी रस्‍त्याने जात असताना त्याची तिच्यावर नजर होती.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

१० एप्रिलला सायंकाळी काम संपवून मुलगी घरी जात होती. त्याचवेळी राजू हा दुचाकीने तिच्याजवळ आला आणि ‘तू मला आवडतेस, सोबत फिरायला चलते का?’ असे म्हटले. घाबरल्याने मुलगी आपल्या घरी निघून गेली. रविवारी सायंकाळी राजूने पुन्हा तिला गाठल. तिचा हात पकडून ठार मारण्याची धमकी दिली.

त्याचप्रमाणे बळजबरी दुचाकीवर बसवून कोराडी हद्दीत आर्यनगर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि बलात्कार केला. रात्री आठच्या सुमारास मुलगी घरी आली. तिच्या आईने तिला विचारणा केली असता रडायला लागली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून राजू कोटरंगे यास अटक केली.

वर्गमैत्रिण झाली गर्भवती

एकाच शिकत असताना १७ वर्षीय मुलीसोबत वर्गमित्राची ओळख झाली. दोघांची मैत्री झाली. दोघेही सोबतच शाळेत ये-जा करीत होते. दोघेही वर्षभरापासून एकमेकांवर प्रेम करीत होते. दोघांनीही अकरावीत प्रवेश घेतला. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांचेही वय केवळ १७ वर्षे होते. शारीरिक आकर्षणापोटी त्याने तिला १० एप्रिल २०२० ला पांजरा येथील झुडुपात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांनी वारंवार जंगलात जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

महत्त्वाची बातमी - रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे तीन प्राणायाम दररोज सकाळी केलेच पाहिजेत

फेब्रुवारी २०२१ पर्यंत तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान मुलगी गर्भवती झाली. तीन महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे दवाखान्यात जाण्याची त्यांना भीती वाटत होती. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे प्रियकराने सक्करदऱ्यातील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे मुलीचे वय आणि सोबत असलेला मुलगा यावरून डॉक्टरांनी प्रकार लक्षात आला.