
Nagpur News
sakal
नागपूर : ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक चौकस झाल्या आहेत. पाकिस्तान संबंधित बारीकसारीक संशयास्पद हालचालीवर तपास यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यातूनच आज नागपुरातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कामठीतील एक शिक्षक आणि एका व्यापाऱ्याला संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.