esakal | मित्राच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न; दोन बायका सोडून गेलेल्या वृद्धाचे कृत्य
sakal

बोलून बातमी शोधा

मित्राच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न; वृद्धाचे कृत्य

मित्राच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न; वृद्धाचे कृत्य

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : वृद्धाने मित्राला पत्नीसह घरी जेवायला बोलावले. जेवण झाल्यानंतर पती मुलासोबत बाहेर गेल्याची संधी साधून वृद्धाने मित्राच्या पत्नीवर बलात्काराचा प्रयत्न केला. दरम्यान, मित्र बेडरूममध्ये आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वृद्धाविरुद्ध बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attempted-atrocity-Nagpur-Crime-News-Case-File-Again-Old-Man-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हिंगोनी (५९) हा चिंचभवनमधील अपार्टमेंटमध्ये राहतो. तो जिल्हाधिकारी कार्यालयात दलाली करतो. त्याला दोन बायका होत्या. दोघींशीही पटत नसल्याने त्या सोडून गेल्या. तेव्हापासून तो फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. त्याचा मित्र पेंटर आहे. त्याने मित्र आणि त्याची २८ वर्षीय पत्नी व दोन मुलांना घरी दोन दिवस राहायला बोलावले.

हेही वाचा: युवकाचा गळा चिरून खून; डोक्यावरही मारल्याची जखम

२४ जुलैला महिला, पती व मुलासह अर्जुन याच्या घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता महिलेचा पती मुलांना घेऊन बाहेर खेळायला घेऊन गेला होता. यादरम्यान अर्जुन याने महिलेला बेडरूममध्ये बोलावले. त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच अर्जुनने बलात्काराचा प्रयत्न केला. या दरम्यान मुलांसह खाली गेलेला पती विसरलेला मोबाईल घेण्यासाठी आतमध्ये आला.

त्यावेळी मित्र पत्नीसह बेडरूममध्ये दिसला. त्यामुळे महिलेने आरडाओरड केली. त्याने अर्जुनला याला जाब विचारला. त्याने महिलेच्या पतीला धमकी दिली. दोघेही पती-पत्नी घरी परतले. त्यानंतर महिलेने दोन दिवसांनंतर बेलतरोडी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

(Attempted-atrocity-Nagpur-Crime-News-Case-File-Again-Old-Man-nad86)

loading image
go to top