कौतुकास्पद! पैशांनी भरलेली बेवारस बॅग परत करून अतुलने दिला प्रामाणिकतेचा प्रत्यय  

sachha yovak
sachha yovak

कळमेश्वर (जि. नागपूर) ः या स्वार्थी जगात अजूनही प्रामाणिकपणा कायम आहे, याचा प्रत्यय अधून-मधून आपल्याला येत असतो. असाच एक प्रामाणिकपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा नागपूर शहरात अनुभवास मिळाला. जिल्ह्यातील कळमेश्‍वर येथे राहणारा एक युवक नागपूर शहरात काही कामानिमित्त आला असता शहरातील एका गजबजलेल्या भागात त्याला थोड्या थोडक्या नव्हे तर चक्क २३ लाख रुपये असलेली एक बॅग सापडते. मात्र, तो युवक त्या पैशांच्या मोहात न पडता ती बॅग मालकाला परत करतो. अतुल गणेश चतूरकर असे त्या प्रामाणिक युवकाचे नाव आहे. 

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात राहणारा अतुल चतूरकर हा नागपुरात एका एटीएम कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करतो. तो शहरातील सीताबर्डी भागात असलेल्या एका एटीएम सेंटरमध्ये मशीनच्या दुरुस्तीच्या कामासाठी जात असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बेवारस बॅगकडे त्याची नजर गेली. त्याने उत्सुकतेपोटी ती बॅग हातात घेऊन पाहिली असता ती बॅग पैशाने भरलेली असल्याचे त्याच्या लक्षात आले. अतुल काही वेळ गोंधळला. काय करावे त्याला सुरुवातीला सुचले नाही. परंतु नंतर त्याने ती बॅग पोलिसांच्या हवाली करण्याचे ठरविले. 

सीताबर्डी पोलिस ठाणे त्या ठिकाणापासून जवळच होते. अतुलने जराही विलंब न करता त्या बॅगसह पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन  
त्या बॅगबद्दल सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अतुलजवळील पैशांनी भरलेली बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगमध्ये नोटांचे बंडल आणि काही धनादेश होते. पोलिसांनी बॅगमधील पैसे मोजले असता ते चक्क २३ लाख रुपये भरले. बॅगमध्ये असलेल्या धनादेशावरील मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी फोन करून बॅगविषयी माहिती दिली. आपल्या पैशांची बॅग पोलिसांना मिळाली आहे हे ऐकून त्या मालकाचा जीव भांड्यात पडला. काही वेळातच तो मालक सीताबर्डी पोलिस ठाण्यात येऊन ती बॅग आपलीच असल्याचे पोलिसांना पटवून दिले. 

पैशांनी गच्च भरलेली बॅग सापडूनही आपल्या गावच्या अतुलने कुठलाही मोह न ठेवता ती सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन केली, ही  अतुलच्या प्रामाणिकतेची बातमी कळमेश्वर शहरात वाऱ्यासारखी पसरली. अतुलच्या या महान कार्याबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल  बुधवारी (ता. १६) कळमेश्वर येथे अतुल चतुरकर याचा सत्कार करण्यात आला. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश लंगडे, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत इखार, किशोर बागडे, मनोज बागडे, किशोर सोनुने, निखिल लामसे, संजय ढोक यांनी अतुलचा त्याच्या घरी जाऊन सत्कार केला.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com