
गवत व झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने विद्यावर झडप घालत नरडीचा घोट घेतला. शंभर मीटर अंतरावर फरकटत जंगलात नेले. काम करीत असलेल्या महिलांना वाघ दिसला. त्यांनी आरडाओरड करीत वाघाच्या तोंडातून महिलेला वाचविले. मात्र, महिलेच्या मानेला वाघाने जबर पंजा मारल्याने जागेवरच मृत्यू झाला.
चिमूर (जि. चंद्रपूर) : कोविडच्या प्रादुर्भावाने सर्व जनजीवन ठप्प पडले होते. अशातच वन विभागाने कोअरमधील नवेगाव परिसरात फायर लाईन कटिंगच्या कामाला सुरवात केली. या कामावर परिसरातील महिला जात आहे. झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने यातील एका महिलेवर झडप घातली. मृत महिलेचे नाव विद्या संजय वाघाडे (रा. बामणगाव) आहे. ही घटना माळकुटी नवेगाव येथील कक्ष क्रमांक ७१ मध्ये घडली.
प्राप्त माहितीनुसार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बामणगाव येथील कोअर क्षेत्रातील माळकुटी नवेगाव परिसरात फायर कटिंगचे काम लॉकडाऊनपासून सुरू झाले. या कामावर परिसरातील २८ महिला आहेत. गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान संपूर्ण महिला फायर लाईन कटिंगचे काम करीत होत्या. काम करीत असताना विद्या वाघाडे (वय रा. बामणगाव) या लघुशंकेसाठी गेल्या.
तेव्हाच गवत व झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने विद्यावर झडप घालत नरडीचा घोट घेतला. शंभर मीटर अंतरावर फरकटत जंगलात नेले. काम करीत असलेल्या महिलांना वाघ दिसला. त्यांनी आरडाओरड करीत वाघाच्या तोंडातून महिलेला वाचविले. मात्र, महिलेच्या मानेला वाघाने जबर पंजा मारल्याने जागेवरच मृत्यू झाला.
वनविभागाने केला घटनास्थळाचा पंचनामा
गुरुवारी सकाळी फायर लाईन कटिंगचे काम करीत असताना महिला लघुशंकेसाठी गेली. तेव्हाच झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर झडप घातली. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना माळकुटी नवेगाव येथील कक्ष क्रमांक ७१ मध्ये घडली. कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला.
संपादन - नीलेश डाखोरे