औरंगजेबाला मानणारे आजही आहेत, प्लॅनिंग करून दंगल; नागपूर प्रकरणी विहिंपचा आरोप

Nagpur Riots : नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने पत्रकार परिषद घेत आणखी गंभीर आरोप केले.
Nagpur riots: Police deployed in sensitive areas after violent clashes over Aurangzeb’s tomb controversy
Nagpur riots: Police deployed in sensitive areas after violent clashes over Aurangzeb’s tomb controversyesakal
Updated on

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी सायंकाळी हिंसाचार झाला. यात अनेक गाड्या पेटवण्यात आल्या आणि दगडफेकीचीही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीने हल्ला केला गेला. या प्रकरणी आतापर्यंत ५० जणांना अटक करण्यात आलीय. विधानसभेतही या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं. तसंच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही अशा शब्दात फडणवीस यांनी इशारा दिला. या सगळ्या घडामोडींवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने पत्रकार परिषद घेत आणखी गंभीर आरोप केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com