
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज स्थगिती दिली. त्यांच्या या आदेशाने कडू यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र ठरवले होते. दोन आठवड्यांनंतर या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.