Bachhu kadu : तिसऱ्या आघाडीवर उलटला डाव....बच्चू कडू यांचा धक्कादायक पराभव
Maharashtra Vidhan Sabah Election : अचलपूर मतदारसंघात तिसरी आघाडी स्थापन केल्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे यांनी विजय मिळवून नवा इतिहास रचला.
चांदूरबाजार : सलग चारवेळा अचलपूर मतदारसंघातून विजयी होऊन पाचव्यांदा आमदार होण्याची तयारी करणाऱ्या अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी स्थापन केलेल्या तिसऱ्या आघाडीमुळे त्यांच्यावर डाव उलटल्याचे मानले जात आहे.