Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा
Farmers Festival: विदर्भात बळीराजाच्या साथीदार वृषभ राजाचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खांदेमळणी, पोळा आणि कर या तीन दिवसांत कृषी संस्कृतीचा हा उत्सव गावागावात रंगतो.
वाशीम : पेरणी ते कापणी हा जगातील नवनिर्मितीचा सोहळा जगाचे पोट भरण्याचे काम करतो, या नवनिर्मितीचा शिलेदार असलेल्या बळीराजाचा सोबती असलेला बैल, ज्याला वृषभ राजा म्हटले जाते, त्याचा सण बैलपोळा हा साजरा होत आहे.