

मूल : बांबू कटाईचे काम करीत असताना वाघाने दोन मजुरांवर हल्ला करून ठार केले. ही घटना ताडोबा बफर क्षेत्रातील मामला आणि महाडवारी परिसरात शनिवार (ता. २७) घडली. मृतांमध्ये प्रेमसिंग दुखी उदे (वय ५५, रा. बालाघाट) आणि बुदसिंग श्यामलाल मडावी (वय ४१, रा. मुंडला, बालाघाट) यांचा समावेश आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे बांबू कटाईचे काम करणाऱ्या मजुरांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.