esakal | शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लेखन असलेल्या "त्या' पुस्तकावर बंदी घाला 

बोलून बातमी शोधा

Shivaji Maharaj

डॉ. विनोद अनाव्रत यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबाबत शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माहिती देताना ते म्हणाले की, या पुस्तकाचे शीर्षकच मुळात आक्षेपार्ह आहे. कारण शीर्षकासह संपूर्ण पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी नावाने केला आहे. यात शिवाजी महाराज यांच्यासह मराठा, ब्राह्मण समाजाला लक्ष्य करून त्यांच्याविषयी सुडाची व द्वेषाची भावना निर्माण करणारे लेखन करण्यात आले आहे.

शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लेखन असलेल्या "त्या' पुस्तकावर बंदी घाला 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : लेखक डॉ. विनोद अनाव्रत यांनी लिहिलेल्या "शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन केलेले आहे. त्यामुळे या पुस्तकावर तत्काळ बंदी घाला, अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

डॉ. विनोद अनाव्रत यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबाबत शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माहिती देताना ते म्हणाले की, या पुस्तकाचे शीर्षकच मुळात आक्षेपार्ह आहे. कारण शीर्षकासह संपूर्ण पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी नावाने केला आहे. यात शिवाजी महाराज यांच्यासह मराठा, ब्राह्मण समाजाला लक्ष्य करून त्यांच्याविषयी सुडाची व द्वेषाची भावना निर्माण करणारे लेखन करण्यात आले आहे. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणाचे शीर्षक "शिवाजीच्या महानतेचा बागुलबुवा' असे आहे. या प्रकरणात "शिवाजीचा फुगा कोणी व का फुगवला' असे एक उपप्रकरण आहे. लेखकाच्या मते, ब्राह्मणांनी शिवाजीचा फुगा फुगवला व त्याची प्रेरणा त्यांनी महात्मा फुले यांच्याकडून घेतली, असे मत मांडले आहे. शिवाय या पुस्तकात औरंगजेबाची वारेमाप स्तुती केली आहे. औरंगजेब हा शिवाजी महाराजांपेक्षा कसा श्रेष्ठ होता, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, यात जातीवाचक उल्लेख करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही लेखकाने केला आहे. 

अवश्‍य वाचा- लुप्त होणाऱ्या लिपींचे संवर्धन गरजेचे ​

लेखक, प्रकाशकावर गुन्हे दाखल करा

विकृत मानसिकतेतून लिहिण्यात आलेल्या या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी, लेखक व प्रकाशनाच्या मालकावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी कुळकर्णी यांनी यावेळी केली. तसेच अमरावती पोलिस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास व भाजयुमोच्या शिवाणी दाणी उपस्थित होत्या.