बांग्लादेशींना मांसाहार पचविण्यासाठी हवीत संत्री! सर्वाधिक संत्री आयात करणारा देश

nagpur oranges
nagpur orangese sakal
Updated on

नागपूर : कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढल्यानंतर देशात रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून विदर्भातील संत्र्यांची (nagpuri orange) मागणी झपाट्याने वाढली होती. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल बांगलादेशात याच संत्र्यांचा उपयोग तब्बल २० वर्षापासून मासांहार पचवण्यासाठी (uses of nagpuri orange) केला जात आहे. त्यामुळेच हा देश नागपुरी संत्र्याचा मोठा आयातदार देश आहे. याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांनाही होतो.

nagpur oranges
National Handloom Day 2021 : नागपूरच्या साडीला मिळणार GI मानांकन

बांगलादेशी नागरिकांच्या दररोजच्या जेवणात गाय, बैल, म्हैस सारख्या पाळीव प्राण्यांच्या मांसाचा समावेश असतो. या प्राण्यांचे मांस पचायला जड समजले जाते. त्यामुळेच पचण्यासाठी संत्र्यांचा ज्यूसच्या रूपात वापर केला जातो. दोनशे वर्षापूर्वी रघूजी राजे भोसले यांनी नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यातून संत्र्यांच्या काही कलमा सोबत आणल्या होत्या. तेव्हापासून नागपूर व लगतच्या प्रदेशात संत्र्याच्या फळ शेतीला सुरुवात झाली. मात्र, आजही आपले शेतकरी तेच दोनशे वर्षांपासूनच्या प्रजातीच्या संत्र्यांचे वाण शेतात लावतात व शेती करतात. तेव्हापासून आजपर्यंत नागपूरच्या संत्र्याच्या या प्रजातीवर ठोस संशोधन झाले नाही. नागपूरचा संत्रा म्हणून ओळखला जातो तो संत्रा नसून मॅडरिना आहे असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

मूळ संत्री म्हटले की ते नारंगी रंगाचा असतात. मात्र, आपला नागपुरी संत्री हा हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा आहे. इतर प्रमुख देशांतील संत्री गोड आहेत. नागपुरी संत्री चवीला आंबट, गोड लागतात. प्रक्रिया करणे सोपे जात असल्याने जगात सिडलेस संत्र्याला मागणी असते. आपली संत्री टेबल फ्रूट असल्याने इतर देशात मागणी नसली तरी बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. बांग्लादेश संत्र्याचा सर्वाधिक निर्यात करण्यात येते.

संत्र्याचे उपयोग अनेक -

मुख्यतः संत्री जेवणानंतर आवडीने खातात. सिट्रस प्रजातीतील इतर फळांपमाणे या फळात क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. फळांचा रस पेय म्हणून घेतला जातो. तसेच मार्मालेड व जेलीचे उत्पादन केले जाते. सालीपासून बाष्पनशील तेल व पेक्टिने मिळतात. तेलाचा उपयोग स्वादकारक व सुगंधी द्रव्यांत करतात. पाने व अगशाखांपासून पेटिटगेन तेल काढले जाते.

नागपुरी संत्र्याचा एकमेव आणि मोठा आयातदार बांगलादेश आहे. एकूण उत्पादनाच्या दीड लाख मेट्रिक टन संत्रा एकट्या बांगलादेशला निर्यात होतो. पश्चिम बंगाल मार्गे रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून संत्रा भारतातून बांगलादेशला जातो.
-श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com