

Investigation underway into the kidney racket involving Bangladeshi victims and surgeries in Tamil Nadu.
Sakal
Bangladesh Kidney Case : तमिळनाडू येथील त्रिचीमधील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. या रुग्णालयात बांगलादेशातून पीडितांना आणून त्यांच्या किडनी काढल्या जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार सोलापूरचा रामकृष्ण सुंचू उर्फ डॉ. कृष्णा असल्याचे स्पष्ट झाले आहे.