Cyber Crime
esakal
नागपूर - शेअर ट्रेडिंगच्या नावाने शहरातील एका डॉक्टरची १५ लाख १० हजाराने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. या तिघांनीही सायबर चोरट्यांना आपले बॅंक खाते वापरण्यास दिल्याचे चौकशी उघड झाले. तपासात या तिन्ही बॅंक खात्यांमधून २ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.