

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक एजंट आहेत. त्यांचे भाजपच्या अनेक उमेदवारांशी साटेलोटे होते. त्यामुळेच आपला पराभव झाल्याचा खळबळजनक आरोप संघाचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी केला. त्यामुळे काँग्रेसच्या समीक्षा बैठकीत अस्वस्थता पसरली.