BARC introduces eight new crop varieties : बीएआरसीने शेतकऱ्यांसाठी आठ नवीन वाणांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये उष्णतेला प्रतिकार करणारे, उच्च उत्पादन देणारे आणि नॉन-जीएमओ वाणांचा समावेश आहे. हे वाण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास आणि अन्न सुरक्षा सुधारण्यास मदत करतील.
मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) ट्रॉम्बे पिकाचे आठ नवीन वाण शेतकऱ्यांसाठी आणले आहेत. किरणोत्सार-आधारित उत्परिवर्तन प्रजनन तंत्राचा वापर करून हे वाण विकसित करण्यात आले आहेत.