
गडचिरोली : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू हा संघटनेतील गद्दारांमुळे मारला गेला व त्याला पुरेशी सुरक्षा पुरविण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली माओवाद्यांचा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता ‘विकल्प’ याने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.