Nagpur Crime News : विक्रेत्याला खंडणीसाठी केली मारहाण; रेल्वे स्थानक परिसरातील घटना; तिघांना अटक

पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.
beating the seller for extortion Incidents around nagpur railway stations three arrested
beating the seller for extortion Incidents around nagpur railway stations three arrestedSakal

नागपूर : रेल्वे स्थानक परिसरात हातठेला लावायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अशी धमकी देऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. चेतन प्रमोद गोखले (२३) रा. सावरबांधे लेआऊट हुडकेश्वर, सोमनाथ राजू जाधव (२७) रा. सेवासदन मानेवाडा आणि संजय दिना झोले (२५) रा. बारा सिग्नल बोरकरनगर इमामवाडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

खलासी लाईन, मोहननगर येथे राहणारे मोहम्मद शाकीब ऊर्फ मोहम्मद शब्बीर (५०) हे नागपूर मुख्य रेल्वे स्थानकावर चहा आणि नाश्ताचा ठेला लावतात. दरम्यान ८ मे रोजी तिन्ही आरोपी त्यांच्या ठेल्याजवळ आले. सामानाची फेकाफेक सुरू केली. त्यांना मारहाण केली. येथे ठेला चालवायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अन्यथा ठार करू, अशी धमकी दिली. घाबरलेल्या शाकीब यांनी सीताबर्डी पोलिस ठाणे गाठले.

पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा कबूल केल्याचे सांगितले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कदम, पोलिस उपनिरीक्षक निवोद तिवारी, विक्रमसिंग ठाकूर आदींनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com