B.Ed CET 2026 Exam Cancelled in Nagpur
esakal
नागपूर, ता. २८ : राज्याच्या सामायिक परीक्षा प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने शुक्रवारपासून सुरू झालेल्या बी.एड सीईटी दरम्यान नागपूरच्या वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावर सलग दुसऱ्या दिवशी सीईटी सेलचा भोंगळ कारभार उघडकीस आला. त्यामुळे शेकडो विद्यार्थी दुसऱ्याही दिवशी परीक्षेला मुकले. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला.