esakal | कोरोना बाधितांसाठी आणखी हजार बेड आणणार कुठून, महापालिकेसमोर आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

beds not enough for corona patients in nagpur

शहरात महापालिकेच्या केवळ दोन हॉस्पिटलमध्येच तूर्तास बेड उपलब्ध आहे. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ३२ तर इंदिरा गांधी रुग्णालयात ११० बेड आहेत. याशिवाय मेडिकल व मेयोमध्ये प्रत्येकी ६०० बेड असून ६७ खाजगी हॉस्पिटलमध्ये २ हजार ३४३ बेड सध्या उपलब्ध आहेत.

कोरोना बाधितांसाठी आणखी हजार बेड आणणार कुठून, महापालिकेसमोर आव्हान

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात बाधित वाढत असून आज ३१ हजारांवर सक्रीय रुग्ण आहेत. यातील अनेक रुग्णांना गरज पडल्यास कोविड रुग्णालयात हलविण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी एक हजार बेड वाढविण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. परंतु, एकीकडे खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असून त्यात त्यांच्यावर कोविड रुग्णालयांचाही भार टाकण्याशिवाय पर्याय नाही. खासगी रुग्णालयांनी नकार दिल्यास एक हजार बेड आणणार कुठून? असा सवाल महापालिका प्रशासनापुढे उभा ठाकला आहे.

हेही वाचा - शेतातून परतल्यानंतर आई-वडिलांनी घेतला मुलाचा शोध; बाथरूमचा दरवाजा उघडला आणि सर्वच संपल

शहरात महापालिकेच्या केवळ दोन हॉस्पिटलमध्येच तूर्तास बेड उपलब्ध आहे. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ३२ तर इंदिरा गांधी रुग्णालयात ११० बेड आहेत. याशिवाय मेडिकल व मेयोमध्ये प्रत्येकी ६०० बेड असून ६७ खाजगी हॉस्पिटलमध्ये २ हजार ३४३ बेड सध्या उपलब्ध आहेत. यात मेडिकलमध्ये आणखी चारशे बेडने वाढ होणार आहे. परंतु, शहरात दररोज अडीच ते तीन हजारांपर्यंत बाधित आढळत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. ६७ खाजगी हॉस्पिटलमध्ये २३४३ बेड मागण्यात आले आहेत. अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू आहे. या हॉस्पिटलमध्ये बाधितांसाठी बेड उपलब्ध केल्यास लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे लसीकरण की बाधितांसाठी बेड? या पेचात प्रशासन सापडले आहे. त्यामुळे एक हजार बेड वाढविण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. 

loading image
go to top