कृषी कायदा मागे : कॉंग्रेसने फोडले फटाके | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी कायदा मागे : कॉंग्रेसने फोडले फटाके

नागपूर : कृषी कायदा मागे : कॉंग्रेसने फोडले फटाके

नागपूर : गेल्या वर्षभरापासून शेतकरी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत होते. अखेर शेतकऱ्यांपुढे नतमस्तक होत केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घेतल्याने कॉंग्रेसने शेतकरी विजय दिवस साजरा करीत फटाके फोडले. तसेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत जल्लोष साजरा केला.

तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याने कॉंग्रेसने हा दिवस शेतकरी विजय दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या आदेशानुसार आज शहरातील कॉंग्रेसच्या देवडिया भवन येथील कार्यालयापुढे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात आला.

शहर कॉंग्रसचे महासचिव डॉ. गजराज हटेवार यांच्या नेतृत्त्वात प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे महासचिव अतुल कोटेचा, सचिव गिरीश पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी किसान मजदूर एकता जिंदाबाद, कॉंग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आला.

हेही वाचा: नाशिक : मागासवर्गीय वसतिगृहाचा निधी मिळावा

यावेळी यावेळी शहर कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी सर्वश्री माजी नगरसेवक प्रशांत धवड, रमन पैगवार, किशोर गीद, डॉ. प्रकाश ढगे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ईरशाद अली, अध्यक्ष डॉक्टर आघाडीचे अध्यक्ष डॉ. सुधीर आघाव, रवि गौर, महेश श्रीवास, अशोक निखाडे, सरफराज खान, ॲड. अभय रणदिवे, धरम पाटिल, ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, अब्दुल शकील, गोपाल पटटम, मोतीराम मोहाडीकर, ज्ञानेश्वर ठाकरे, पंकज निघोट, रणजित देशमुख, सुनिता ढोले, सजय सरायकर, पंकज थोरात, संजय गभने, मनीष चांदेकर, सुनिल पाटिल, प्रफुल भांजे, हेमंत चैधरी, स्नेहल दहीकर, सुकेशिनी डोगरे, रिमा चव्हाण, बबलु तिवारी, मनीष कनोजिया, विजय सरायकर, आतिष शेवते, सर्वजीत चहांदे, रामभाउ कळंबे, बंडू ठाकरे, जितेद्र हावरे, नंदा देशमुख, रंजना कडूकर, गीता जळगावकर, वंदना मेश्राम, फारुक मलीक, सदानंद सपाटे, साहेबराव देशमुख, संतोष गोटाफोडे आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top