
नागपूर : विदर्भातील अनेक जिल्हे उन्हाच्या टचक्यांनी पोळलेले असताना यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यात मंगळवारी (ता.१०) रोजी वादळी वाऱ्यांसह पावसाचे आगमन झाले. अनेक ठिकाणी घरावची टिनपत्रे उडाली. झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडित होण्यासह वाहतूक ठप्प झाली. तर चंद्रपुरात मुसळधार पाऊस कोसळला.