

A Newborn Baby Dies Within Around One and a Half Days of Birth After the Mother Was Hospitalised Following a Suspected Food Poisoning Incident in Kharashi, Bhandara.
esakal
भंडारा : खराशी येथे बुधवारी (ता.२१) महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन गर्भवती महिलांपैकी पूजा राहुल सरदार यांच्या नवजात बाळाचा दीड दिवसानंतर मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूमुळे सरदार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता, तर त्याची प्रकृती दीड दिवस स्थिर कशी होती आणि अचानक मृत्यू कसा झाला,