esakal | ओबीसी’ आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

ओबीसी’ आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर: ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याखेरीज महापालिकेची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या ओबीसीच्या मार्चाच्यावतीने संविधान चौकात निदर्शने करून महापालिकेवर धडक देण्यात आली. यावेळी कार्यर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, खासदार डॉ. विकास महात्मे, ओबीसीचे मार्चचे अध्यक्ष रमेश चोपडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास, महापालिकेतील सत्तापक्ष पक्षनेते अविनाश ठाकरे, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

हातात पक्षाचे झेंडे, फलक व मोठे बॅनर घेऊन नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधान चौकात राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. राज्यघटनेने आरक्षण दिले असल्याने राज्य सरकार समाजाला हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. आरक्षणविना निवडणूक हा समाजावर अन्याय आहे. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नागपूर महापालिकेची निवडणूक घेऊ नये, अन्यथा बूथ पातळीपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नेत्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: डेंगीचा डंख उठला जीवावर, एकाच गावातील दोन तरुणींचा मृत्यू

आमदार मोहन मते, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, सचिव धर्मपाल मेश्राम, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, डॉ. मिलिंद माने, रमेश गिरडे, संजय बंगाले राम आंबुलकर, सुनील मित्रा, संजय बंगाले, नरेंद्र बोरकर, मोर्चाचे सरचिटणीस मनोहर चिकटे, सुनील चिमोटे, मंडळ अध्यक्ष घनश्याम खवले, शंकरराव चौधरी, दशरथ मस्के, नरेश बरडे, कमलेश चकोते, विनोद बांगडे आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले.

loading image
go to top