esakal | नाना पटोले अपघातग्रस्ताच्या मदतीला धावतात तेव्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोले अपघातग्रस्ताच्या मदतीला धावतात तेव्हा...

नाना पटोले अपघातग्रस्ताच्या मदतीला धावतात तेव्हा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नेते म्हणजे फक्त आश्वासन देणारे... मात्र, त्याची पूर्तता क्वचितच (Nana Patole) करतात. तसेच नेते त्यांचीच मदत करतात ज्यांच्याकडून त्यांना फायदा असतो, अशी सर्वसामान्यांची समज झाली आहे. लाल दिव्यांच्या पांढऱ्या गाडीतून जाणारे नेते कुणाच्याही मदतीसाठी थांबत नाही. कोणत्या कार्यक्रमाला जात असल्यास गाडीतून उतरूनही (nana patole helps to man) पाहत नाही. नागरिक असो किंवा पत्रकार त्यांना नेत्यांच्या मागे धावत जावे लागते. मात्र, सोमवारी नेत्याचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. (Nana-Patole-ran-to-the-aid-of-the-accident-victim)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी खाजगी कार्यक्रमानिमित्त कुटुंबासह नागपूरवरून रामटेकला जात होते. त्यांच्या ताफा रामटेकच्या रस्त्यावरून जात असताना एका गाडीचा अपघात झाल्याचे त्यांना दिसले. गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कोणताही विचार न करता चालकाला गाडी थांबवायला सांगितली.

हेही वाचा: शिवसेनेच्या दोन गटात राडा! मास्क न लावल्याच्या कारणावरून वाद

घटनास्थळी जाऊन बघितले असता उमेश दुबे नावाचा व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला त्यांना दिसलाय त्यांनी दुबेला लगेच गाडीत टाकून रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. जखमी दुबेवर उपचार होईपर्यंत ते रुग्णालयात थांबून होतो. उमेश दुबे हे पत्रकार असल्याचे त्यांना काही वेळांनी समजले.

आपल्या वक्तव्यामुळे आणि स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे नेहमी चर्चेत राहणारे नाना पटोले यांचे वेगळेच रूप नागरिकांना पाहायला मिळाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चक्क अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून आल्याचे पाहून नागरिकांनी एकच गर्दी केली होती. रुग्णालयातही मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

(Nana-Patole-ran-to-the-aid-of-the-accident-victim)

loading image