

Retired Mahar Regiment soldiers during a tribute ceremony at Deekshabhoomi.
sakal
नागपूर : महार रेजिमेंट व भीमा-कोरेगावचे अतूट नाते आहे. १८१८ सालच्या युद्धात पुण्यातील पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली. यात पेशव्यांकडे २५ हजार सैन्य होते. इंग्रजांकडे केवळ ५०० महार सैनिक. या पाचशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याला पाणी पाजले. इंग्रजांना या शूरांनी विजय मिळवून दिला. या युद्धातील शहीद महार सैनिकांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी इंग्रजांनी भीमा-कोरेगाव येथे स्मृतिस्तंभ उभारला आहे.