esakal | ...अन् शिरापासून धळ वेगळा झालेला नऊ महिन्यांचा बिबट आढळला
sakal

बोलून बातमी शोधा

Bibat's body was found

...अन् शिरापासून धळ वेगळा झालेला बिबट आढळला

sakal_logo
By
अतुल दंढारे

मेंढला (जि. नागपूर) : नरखेड वनपरिक्षेत्र विभागाच्या बानोर क्षेत्रात बरडपवणी शिवारात रविवारी रात्री सात वाजताच्या सुमारास बिबट मृतावस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे बिबट मुणके छाटले होते. बिबटची शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत बिबट नऊ महिन्यांचा असल्याचे वन विभागामार्फत सांगण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, नागरिकांना मृत बिबट दिसताच याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा न करता बिबटचा मृतदेह वन विभागाच्या कार्यालयात घेऊन आले. तसेच याची माहिती वन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्याला दिली नाही. हे समजताच पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. बिबटचे मुणके घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर पडलेले होते.

हेही वाचा: या पदार्थांचे अतिसेवन शरीरासाठी घातक; कॅल्शिअम होते कमी

परिसर जंगली असल्यामुळे या भागात बिबट असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना येथील नागरिकांनी सांगितले होते. परंतु, वनविभागातर्फे कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची तक्रार मयूर उमरकर यांनी केली आहे. वन विभागाने काही उपाययोजना केल्या असत्या तर बिबटचा जीव वाचला असता. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेला.

नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

सध्या वन महोत्सव सुरू आहे. असे असताना बिबटला जीव गमवावा लागला. सोमवार सकाळी घटनास्थळी बिबटच्या आई व एका लहान पिल्लाचे पायाचे ठसे दिसून आले. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वनविभागामार्फत देण्यात आला आहे.

हेही वाचा: फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे एका बिबट्याचा जीव गेला. बिबटची मुंडी कापून टाकली आहे. त्यामुळे बिबटची शिकार करण्यात आल्याचा संशय आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. या प्रकरणात जे अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी व नरखेड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे.

बिबटची शिकार केल्याची दाट शक्यता आहे. बिबटचा पंचनामा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीमध्ये करून दहन करण्यात आले. गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
- प्रज्योत पालवे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, काटोल
loading image
go to top