esakal | फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : एमबीए करणाऱ्या युवतीशी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तिच्यावर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती राहिल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून दोनदा गर्भपात केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रोशन अनिल ठाकरे (२९, रा. ओमनगर, कळमना) असे आरोपीचे नाव आहे.

२१ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) एमबीए फायनान्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. २०१९ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची रोशनसोबत ओळख झाली. एक वर्ष ते फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक दिले. मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ते व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संवाद साधत असत.

हेही वाचा: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला सुरुवात

त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. सप्टेंबर २०२० मध्ये तरुणीचा वाढदिवस होता. घरच्यांना लोकांना खोटे सांगून ती रोशनसोबत पचमढीला गेली. त्यावेळी रोशनचा एक मित्र व त्याची मैत्रीण सोबत होती. पचमढी येथे त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली असता तरुणीने नकार दिला. आपण लग्न करणार आहोत असे बोलून तिला विश्वासात घेतले आणि अत्याचार केला.

त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तो तिचे शोषण करीत होते. दरम्यान, तिला दिवस गेले. दोन महिन्यांनंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. ही माहिती तिने रोशनला दिली असता त्याने गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. तरुणी गर्भपात करण्यास तयार नव्हती. तरीही तो तिला धमक्या देत जबरीने गर्भपात करून घेतला.

हेही वाचा: सहा वर्षीय मुलाचे अपहरण; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

प्रेयसीच्या विरोधात तक्रार

तरुणीने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला होता. परंतु, काही ना कारण सांगून तिला टाळत होता. काही दिवसानंतर तिला हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा तिचे शोषण केले. त्याही वेळी तिने गर्भपात करून घेतला. तरुणीचा पिच्छा सोडण्यासाठी त्याने तिच्या विरोधात हुडकेश्वर पोलिसात तक्रार केली. आपल्या तक्रारीत त्याने तरुणी ही मला पैशासाठी ब्लॅकमेल करीत असल्याचे सांगितले होते. रोशनने तरुणीच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याचे तरुणीला समजताच ती संतापली. लगेच तिने कळमना पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरोधात तक्रार केली.

loading image
go to top