CM Devendra Fadnavis: निवडणुकीत जिंकतो तोच सिकंदर; मुख्यमंत्री, पराभवानंतर हार स्वीकारता यायला हवी
Bihar Election: बिहार निवडणुकीतील पराभवाचा स्वीकार न करता विरोधकांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच ठेवले आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पराभवानंतर आत्मपरीक्षण करण्याची तयारी विरोधी पक्षांकडे नाही, म्हणूनच त्यांची स्थिती अधिकच दयनीय होत चालली आहे, असे ते म्हणाले.
नागपूर : बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण न करता राहुल गांधी व शरद पवारांसह सर्व विरोधक उलटसुलट आरोप करीत आहेत. जोपर्यंत ते पराभवानंतर आत्मपरीक्षण करीत नाही तोपर्यंत विराेधकांची दुर्दशाच होत राहील.