Bird Flu : ताजबाग परिसरात ‘बर्ड फ्ल्यू’ची लागण; जिल्हाधिकाऱ्यांचे परिसर निर्जंतुकीकरणाचे आदेश
Nagpur News : नागपूरच्या ताजबाग परिसरात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले असून, प्रशासनाने एक किलोमीटरचा भाग बाधित म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्जंतुकीकरणाचे आदेश दिले आहेत.
नागपूर : ‘बर्ड फ्ल्यू’चा शहरात शिरकाव झाला आहे. प्रशासनाकडून तातडीने मोठा ताजबाग परिसरापासून एक किलोमीटरचा भाग बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागाच्या निर्जंतुकीकरणाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.