Kirit Somaiya : नागपुरातही बांगलादेशींच्या जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
Birth Certificate Scam : नागपूरमध्ये बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. महापालिका व तहसीलदार कार्यालयातील आकडेवारीत मोठी तफावत असल्याचेही ते म्हणाले.
नागपूर : नागपूर जिल्हा आणि शहरातही जन्म-मृत्यू नोंदणीबाबत तहसीलदार कार्यालय आणि नागपूर महानगरपालिकेकडे असणाऱ्या आकड्यांमध्ये तफावत आहे. बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे.