esakal | मोदी-शहा यांची राजवट ब्रिटिशांप्रमाणे; काँग्रेसला लढण्याचा अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

मोदी-शहा यांची राजवट ब्रिटिशांप्रमाणे; काँग्रेसला लढण्याचा अनुभव

मोदी-शहा यांची राजवट ब्रिटिशांप्रमाणे; काँग्रेसला लढण्याचा अनुभव

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : काँग्रेसने देशाच्या विकासासाठी उभारलेले सार्वजनिक उपक्रम मोदी यांनी विकायला काढले आहेत. फक्त दोन उद्योगपतींना सर्व सार्वजनिक संपत्ती देऊन देशाला गहाण टाकण्याचे षडयंत्र रचण्यात आले असून आता काँग्रेस गप्प बसणार नाही. भाजपच्या विरोधात मोठा लढा उभा करण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रदीपकुमार जैन यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जैन म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काहीच केले नाही असे वारंवार सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काँग्रेसने देशाच्या विकासासाठी उभारलेले सार्वजनिक उपक्रम विकण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात लोकशाही आहे. घटनेनुसारच देशाचा कारभार चालतो. देशाशी संबंधित कुठलाही निर्णय घेताना लोकसभेत मंजुरी घेतली जाते. त्यावर सर्वपक्षीय चर्चा केली जाते. मात्र, भाजप राज्य घटनेलाही जुमानत नाही. परस्पर सभागृहाबाहेर निर्णय घेऊन लोकशाहीचा खून करीत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

महामार्ग, रेल्वे यासुद्धा विकल्या जाणार आहे. टोलमुळे जनता त्रस्त आहे. उद्योगपती बँकेतून कर्ज काढून देखभालीसाठी महामार्ग हाती घेतली तेव्हा किती पैसे वसूल केले जातील याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. जे सार्वजनिक उपक्रम विकणार आहेत त्याचे मूल्यांकन सरकारने केले नाही. त्यांपैकी किती फायद्यात किती तोट्यात याचाही हिशेब काढला नाही. देश म्हणजे नफा तोट्याचा विचार करणारी खासगी कंपनी नव्हे. लोकांच्या कल्याणासाठी सरकार चालवायचे असते. भाजप ब्रिटिशांप्रमाणे राज्य करीत आहे. त्याविरोधात आता लढा उभारण्याची वेळ आहे. असेही ते म्हणाले.

काँग्रेसला ब्रिटिशांविरोधात लढण्याचा अनुभव

काँग्रेसला ब्रिटिशांविरोधात लढण्याचा अनुभव आहे. मोदी-शहा यांच्या विरोधात स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे आंदोलन उभे केले जाणार असल्याचे प्रदीपकुमार जैन यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महामंत्री अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, हैदरअली दोसानी, उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top