esakal | नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

sakal_logo
By
सुनील सरोदे, ​सतीश घारड

कन्हान (जि. नागपूर) : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट येथे १३ युवक दर्शनासाठी आले होते. यापैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडकीस आली. कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून युवकांचा शोध घेणे सुरू केले. मात्र, अद्याप एकही मृतदेह सापडलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२), अयाज बेग हफीज बेग (वय २०), मो. अनुअर मो. अल्फाज (वय १८), मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) व ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. कन्हानपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाडेघाट येथील अम्माचा दर्गा धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

हेही वाचा: नागपूर : हिंदू मुलींना बुरखा घालण्याचा प्रयत्न

एक सप्टेंबरपासून येथे ताजुद्दीन बाबा यांचा शंभरावा ऊर्स सुरू झालेला आहे. उर्सला उपस्थित राहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या ऊर्सला उपस्थित राहण्यासाठी १३ युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे आले होते. ताजबागच्या उर्समध्ये सहभागी झाल्यानंतर घाडेघाट येथील अम्माचा दर्गामध्ये गेले होते.

यानंतर समोरून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात काही युवक अंघोळ करण्यासाठी गेले. तर काही युवक गाडीमध्ये आराम करीत होते. आंघोळ करीत असताना एक युवक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एका मागोमाग चार युवक गेले. मात्र, तेही वाहून गेले. उपस्थितांनी घटनेची माहिती कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोऱ्याच्या मदतीने युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

loading image
go to top