Chandrashekhar Bawankule : भाजप सर्वच मुस्लिमांच्या विरोधात नाही : बावनकुळे
Political Statement : भाजप मुस्लिम विरोधी नसून भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेणाऱ्यांचा विरोधी असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपाच्या भूमिकेबाबत संभ्रम दूर केला.
नागपूर : भाजप मुस्लिम विरोधी नाही; तर भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात असल्याचे ठाम मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मांडले.