

नागपूर: राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सत्ताधारी भाजप महायुतीतील घटक पक्षांसोबत सोयीच्या ठिकाणी युती करीत आहे. इतर ठिकाणी ते स्वतंत्र लढत आहे. विरोधी पक्षांची देखील निवडणुकांपूर्वी युती, आघाडी होणार होती. त्यासाठी चर्चा, वाटाघाटीही सुरू होत्या. अनेक ठिकाणी जागांचे वाटपही जवळपास निश्चित झाले होते. परंतु शेवटच्या टप्प्यात अचानक वाटाघाटी फिसकटल्या. त्यामुळे स्वतंत्र लढावे लागत आहे. सत्ताधारी भाजपमुळेच युती, आघाडी होवू शकली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.