गोंदिया जिल्ह्यातील पीडितेच्या कुटुंबावर भाजपचा दबाव : अंधारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhima Koregaon case complainant Sushma Andhare will join Shiv Sena tomorrow

गोंदिया जिल्ह्यातील पीडितेच्या कुटुंबावर भाजपचा दबाव : अंधारे

नागपूर - गोंदिया जिल्ह्यातील पीडित महिलेच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून दोन लाख रुपये मदत देऊ केली होती. परंतु त्यांनी ती घेतली नाही. इतरांकडून मदत न स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी  केला. त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचाही समाचार घेतला. भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर सर्व काही होत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. यावेळी आमदार मनीषा कायंदे, सुजाता घाडगे उपस्थित होत्या.

पीडिता व तिच्या कुटुंबाची रविवारी भेट घेतल्यानंतर रविभवन येथे पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे आम्ही सरकारी वैद्यकीय रुग्णालयात तिला भेटायला गेलो. तेव्हा सुरुवातीला आम्हाला तिथे कार्यरत महिला पोलिस शिपायांनी अटकाव केला. पीडितेसाठी आम्ही पक्षातर्फे दोन लाख रुपयाची मदत घेऊन आलो होतो. परंतु आम्हाला तिच्या कुटुंबाला भेटण्यासही नकार दिला गेला. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असताना त्यांनी कुठलेही आदेश नसल्याचे सांगितले.

Web Title: Bjp Pressure On Victims Family In Gondia District Andhare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..