esakal | भाजपचे मिशन नागपूर महापालिका; मुंबईत पार पडली बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

BJPs mission Nagpur NMC begins

भाजपला बदनाम करण्यासाठी महाआघाडीने मोहीम उघडली आहे. त्यात प्रत्युत्तर देताना तत्परतेसोबतच सावधानी बाळगली जात आहे. आपल्या वक्तव्याने कुठलेही वादंग निर्माण होणार नाही

भाजपचे मिशन नागपूर महापालिका; मुंबईत पार पडली बैठक

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर ः आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने प्रदेश प्रचार प्रसार माध्यम विभागाची मुंबईत दोन दिवसीय कार्यशाळा घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनिल बलुनी तसेच आशिष शेलार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. भाजपवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना तत्काळ उत्तर देण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.

भाजपला बदनाम करण्यासाठी महाआघाडीने मोहीम उघडली आहे. त्यात प्रत्युत्तर देताना तत्परतेसोबतच सावधानी बाळगली जात आहे. आपल्या वक्तव्याने कुठलेही वादंग निर्माण होणार नाही तसेच पक्षावर खुलासे देण्याची नामुष्की आणून नका असा सल्ला यावेळी आशिष शेलार यांनी दिला. तत्परतेने व तेवढाच अभ्यासपूर्ण उत्तर दिले जात असल्याने सत्ताधारीसुद्धा घाबरले आहेत.

क्लिक करा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं उघडला बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन 

 केवळ महाघाडीच्यावतीने केल्या जाणाऱ्या आरोपांची बाजूच सर्वसामान्यांपर्यंत जाता कामा नाही. त्याकरिता तेवढेच समर्पक उत्तर देण्याची तयारी ठेवा. पत्रकार परिषदांमध्ये पत्रकारांना सन्मान देताना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. फक्त तोंडी प्रत्यारोप करण्याऐवजी सोबतीला पुरेसे दस्तावेज व साहित्य उपलब्ध करून द्या,असेही शेलार यांनी सांगितले. 

कार्यशाळेला भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्या, विश्वास पाठक, सोमेन मुखर्जी, ओम चौहान,राम बुधवंत, श्वेता पारुळकर, कपिल आदमने, शक्ती ठाकूर, गिरीष जोशी यांच्यासह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र ,कोकण,मुंबई आदी भागातील पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

loading image